Aapale shahar marathi news / आपले शहर मराठी वृत्तवाहिनी

  • Home
  • India
  • Thane
  • Aapale shahar marathi news / आपले शहर मराठी वृत्तवाहिनी

Aapale shahar marathi news / आपले शहर मराठी  वृत्तवाहिनी MAHARASTRAS MARATHI WEB PORTAL NEWS CHANNEL

27/08/2026
26/08/2026

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग; पुण्यतिथीच्या दिवशीच उद्यानाचे टाळे उघडले

डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील कल्याण डोंबिवली महापालिकेचे धर्मवीर आनंद दिघे साहेब उद्यान हे मागील दीड वर्षांपासून नियमित सकाळ, संध्याकाळ उघडले जात नव्हते. याचे मुख्य कारण की या उद्यानावर असलेला कंत्राटी सुरक्षा रक्षक ठेकेदाराचा ठेका संपलेला होता. नवीन ठेकदाराची नेमणूक न झाल्याने व त्यामुळे सुरक्षा रक्षक नसल्याने हे उद्यान नियमित उघडले जात नव्हते. यामुळे ज्येष्ठ नागरिक, बालगोपाल मंडळी यांचा हिरमोड झाला होता. यामुळे उद्यानात असलेले ओपन जिम, लहान मुलांची खेळणी, जॉगिंग ट्रॅक, लहान मोठी झाडे यांची देखभाल होताना दिसत नव्हती. वरील उपरोक्त बाबी या कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त आणि उद्यान विभाग आणि लोकप्रतिनिधींना वारंवार सांगितल्या जात होत्या.परंतु यावर योग्य अशी कार्यवाही होताना दिसत नव्हती. शेवटी त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एमआयडीसी शाखेने धर्मवीर आनंद दिघे यांच्या २६ व्या पुण्यतिथी निमित्ताने बुधवार २६ तारखेला याच उद्यानाच्या प्रवेशद्वारावर धर्मवीर आनंद दिघे याना श्रद्धांजली वाहून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या संदर्भातील सर्व बातम्या यापूर्वी माध्यमांत आल्या होत्या. परंतु केडीएमसीने तत्परतेने कार्यवाही करून आज सकाळी महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स यांचा एक सुरक्षा रक्षक पाठवून हे उद्यान उघडले आहे. शिवाय या उद्यानात आता वाढलेली झाडी झुडपी काढण्याचे व साफसफाई करण्याचे काम चालू करण्यात आले आहे. सदर हे उद्यान उघडल्याने आणि सुरक्षा रक्षक, साफसफाई सुरू झाल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे होणारे आंदोलन हे धर्मवीर आनंद दिघे याना श्रद्धांजली वाहून स्थगित करण्यात आले आहे असे माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, माजी विभाग प्रमुख राजू नलावडे, उपविभाग प्रमुख मंदार स्वर्गे, शाखाप्रमुख सागर पाटील यांनी सांगितले आहे
#धर्मवीरआनंददिघे #आनंददिघे #डोंबिवली #डोंबिवलीन्यूज #केडीएमसी #धर्मवीरआनंददिघेउद्यान #शिवसेना #उद्धवबाळासाहेबठाकरे #शिवसेनाआंदोलन #उद्यान #ठाणेन्यूज #कल्याणडोंबिवली

26/08/2026

“भूमीपुत्रांना मारहाण; विकासकावर गुन्हा दाखल करा!” — आमदार राजेश मोरे
आक्रमक

डोंबिवलीजवळील माणगाव येथील पिंपालदेवी परिसरात मंगळवार २५ तारखेला सकाळच्या सुमारास एका उत्तरभारतीय विकासकाने अतिक्रमण करून स्थानिक भूमीपुत्र्यांना मारहाण केल्याचा हर्षदा अमोल ठाकूर यांनी केला आहे. कल्याण ग्रामीण मतदान संघांचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी ठाकूर कुटुंबियांची भेट घेतली. आमदार मोरे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांची भेट घेतली. स्थानिक भूमीपुत्रांना माऱहाण करणाऱ्या त्या विकासकावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे.
#माणगाव #डोंबिवली #पिंपालदेवी #भूमीपुत्र #अतिक्रमण #विकासक #मारहाण #राजेशमोरे #शिवसेना #कल्याणग्रामीण #मानपाडापोलीस #ठाणे #डोंबिवलीन्यूज #माणगावन्यूज #स्थानिकबातमी #भूमीपुत्रांचाआवाज #अतिक्रमणविरोध #पोलीसकारवाई #आपलेशहरनामा

25/08/2026

जागेवरून वाद.... माणगावात परप्रांतिय विकासकाची दादागिरी...

जागेवर ताबा घेण्यासाठी भूमीपुत्रांना मारहाण..

अतिक्रमणाला विरोध केल्याने भूमीपुत्रांना मारहाण; मानपाडा पोलिसांत तक्रार ... आरोपींवर तातडीने कारवाईची मागणी

पायावर दगड मारून जखमी केल्याचा आरोप; कुटुंबीयांनी घेतली पोलिसांची धाव

माणगावातील जागेचा वाद चिघळला; विकासकाविरोधात ठाकूर कुटुंबीय आक्रमक

जागेवर कब्जाचा प्रयत्न अन् मारहाण; आरोपींवर तातडीने कारवाईची मागणी

#माणगाव #डोंबिवली #जागेचा_वाद #भूमीपुत्र #जागेवर_ताबा #अतिक्रमण #विकासक #विकासकाची_दादागिरी #भूमीपुत्रांवर_मारहाण #मानपाडा_पोलीस #पोलीस_कारवाई #माणगाव_बातमी #डोंबिवली_बातमी #ठाणे_बातम्या #आपलेशहर #आपलेशहरन्यूज

25/08/2026

दिव्यातील फेरीवाला सर्वेक्षणात गैरप्रकाराचा आरोप; मनसे आक्रमक....

उत्तर प्रदेशातील रेशनकार्ड असलेल्या व्यक्तींच्या सर्वेक्षणावर मनसेचा सवाल; पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
..महापालिका कर्मचाऱ्यांसोबत वसुली करणाऱ्या व्यक्तींच्या सहभागाचा आरोप; चौकशीची मनसेची मागणी

फेरीवाला सर्वेक्षणाच्या नावाखाली नेमके काय सुरू आहे? मनसेने उपस्थित केले गंभीर प्रश्न

सर्वेक्षण प्रक्रियेतील कथित गैरप्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मनसेचा निशाणा

परराज्यातील कागदपत्रे असलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण कशाच्या आधारावर? मनसेचा महापालिकेला सवाल

फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप; दोषींवर कारवाईची मागणी

महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर संशय; सर्वेक्षण प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी

दिव्यातील फेरीवाला सर्वेक्षण चर्चेत; मनसेने अधिकाऱ्यांना दिला कारवाईचा इशारा
#दिवाnews #फेरीवालासर्वेक्षण #फेरीवाला #मनसे #मनसेआंदोलन #मनसेआक्रमक #महापालिका #केडीएमसी #दिवामुंब्रा #सर्वेक्षण #गैरप्रकार #पारदर्शकता #चौकशीचीमागणी #फेरीवाल्यांचेहक्क #महाराष्ट्रनवनिर्माणसेना #आपलेशहरन्यूज

दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २७ व २८ मध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात...
24/08/2026

दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २७ व २८ मध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

दिवा परिसरातील संबंधित जलवाहिनीवरील ५०० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी आणि त्यावरील ५०० मि.मी. व्यासाचा कॉल्व्ह नादुरुस्त असल्याने पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २७ व २८ मधील नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात विभागाकडे प्राप्त होत आहेत.

नादुरुस्त कॉल्व्हची दुरुस्ती/बदलणी करणे गरजेचे असल्याने मुख्य जलवाहिनीचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करावा लागणार आहे. या कामासाठी २४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.

निळजे येथून महानगरपालिकेच्या जलवाहिनीवरून होणारा पाणीपुरवठा २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल. मात्र, त्यानंतर पुढील काही दिवस परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा आणि ठाणे महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भातील माहिती ठाणे महानगरपालिकेचे उप नगर अभियंता विनोद पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.

24/08/2026

नवी मुंबईत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; मे. पी. के. डेअरीतील दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश ..

नवी मुंबईत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; मे. पी. के. डेअरीतील दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश

#नवीमुंबई #अन्नवऔषधप्रशासन #दूधभेसळ #दूधभेसळरॅकेट #पीकेडेअरी #मोठीकारवाई #दूधभेसळकांड #अन्नसुरक्षा #भेसळविरोधीकारवाई #नवीमुंबईन्यूज #महाराष्ट्रन्यूज #ब्रेकिंगन्यूज #आपलेशहरन्यूज

24/08/2026

राखी पौर्णिमेसाठी क्षितिजच्या विशेष मुलांनी बनवल्या आकर्षक राख्या

डोंबिवली पश्चिम : प्रतिनिधी

डोंबिवली पश्चिम येथील क्षितिज संचालित मतिमंद मुलांच्या शाळेत राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने विविध आकर्षक राख्या तयार केल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावना निर्माण झाली.

शाळेतील विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी धागे, मणी, सजावटीच्या वस्तू आदींचा वापर करून सुंदर राख्या तयार केल्या. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला. स्वतः तयार केलेल्या राख्या पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले.

राखी पौर्णिमा हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण असून, या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकौशल्यातून या नात्याचा सुंदर संदेश दिला. विशेष मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे पालक व नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
#राखीपौर्णिमा #राखी #क्षितिजशाळा #विशेषमुले #विशेषविद्यार्थी #डोंबिवलीपश्चिम #डोंबिवली #विद्यार्थीउपक्रम #हस्तनिर्मितराख्या #राखीनिर्मिती #सर्जनशीलता #कलागुणांना_वाव #विद्यार्थ्यांचेकलागुण #स्वावलंबन #आत्मविश्वास #शिक्षकांचेमार्गदर्शन #रक्षाबंधन #भाऊबहिणीचेनाते #विशेषमुलांचीकलाकारी

Address

Thane
400612

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapale shahar marathi news / आपले शहर मराठी वृत्तवाहिनी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aapale shahar marathi news / आपले शहर मराठी वृत्तवाहिनी:

Shortcuts

Share