11/04/2024
थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांची आज 11 एप्रिल रोजी जयंती आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी इ.स. 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपवली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली..