15/08/2017
भारतीय स्वातंत्र्य चळवळ.
पूर्ण अहिंसक मार्गांन आणि आपल्या विरोधकाबद्दल निर्वैर भावनेन्लढलेल जगातल एकमेव स्वतंत्र्ययुधः', अस वर्णन प्रख्यात शास्रज्ञ आईन्स्टाइन यांनाही करावा लागेल, अशी ही चळवळ.
१५ ऑगष्ट १९४७ रोजी या चलवळीने कळसाध्याय गाठला- भारत देश स्वातंत्र झाला.म्हणजेच independance झाला।मुळात Independence day पेक्षा मला स्वातंत्र दिवस जास्त परिणाम कारक वाटतो, कारण स्वातंत्र म्हणजे स्वतःच तंत्र, स्वतः निर्माण केलेली व्यवस्था व स्वतःच बंधन.
स्वातंत्र्य हां केवळ शब्द नाही. 'परकीय शक्तिपासून मुक्ति मिळालेली स्थिति' एवढंच या शब्दाच वर्णन नाही, तर स्वातंत्र्य ही एक संकल्पना आहे व या संकल्पनेचा उगम भारतीय तात्विक विचारांत आहे.स्वातंत्र्य म्हणजे मुक्ति, हक्क, जबाबदारी या जाणिवांचा संगम होय. हे सूत्र आपल्याला मनात खोलवर रुजवाव लागेल.आपले नेते व नागरिक असं अर्थपूर्ण स्वातंत्र्य देशात सर्वत्र प्रस्थापित करतील, अशी आशा येत्या स्वातंत्र्य दिनानिम्मित्त करू या..