Car Time मराठी

Car Time मराठी गाडयांबद्दल सर्व काही… आपल्या मराठीत प्रथमच…! एक नवीन मराठी पेज, जिथे आपल्यासाठी आहे कार्स बद्दल भरपूर माहिती. आपले स्वागत आहे कार टाईम मराठीत…!

ऑडी ची नवीन जाहिरात आवडल्यास लाईक करा...!http://bit.ly/2ds51hc
27/09/2016

ऑडी ची नवीन जाहिरात आवडल्यास लाईक करा...!
http://bit.ly/2ds51hc

The race to be the next Commander-In-Chief has never been fiercer, with the debates heating up to become the duel of the century. Audi is bringing you our ow...

29/05/2015
नवीन टाटा नॅनोमध्ये आता ऑटोमॅटीक गियरचा पर्याय...! किंमत २ लाखांपासून पुढे.टाटाने आज आपल्या जेनएक्स नॅनो या मॉडेलचे अनाव...
19/05/2015

नवीन टाटा नॅनोमध्ये आता ऑटोमॅटीक गियरचा पर्याय...! किंमत २ लाखांपासून पुढे.

टाटाने आज आपल्या जेनएक्स नॅनो या मॉडेलचे अनावरण केले. ऑटोमेटेड म्यॅनुअल ट्रान्समिशन (ए एम टी) असलेली ही गाडी बऱ्याच महिन्यांपासून प्रतिक्षित होती. नॅनोच्या या नव्या अवतारात अजून एक महत्वाची बाब म्हणजे, यात डिकीचे दार उघडता येते. यापूर्वीच्या नॅनोमध्ये डीकीचा दरवाजा उघडण्याची सोय नव्हती.

ऑटोमॅटीक गियरचा पर्याय असल्यामुळे वाहतुकीची गर्दी असलेल्या ठिकाणी आणि विशेषतः महिलांना ही गाडी चालवण्यास अगदी सोपी असेल. यात क्लच नसल्यामुळे फक्त अॅक्सेलेरेटर आणि ब्रेक वर ही गाडी चालवता येते. मोठ्या शहरांमधील वाढती वाहतुक लक्षात घेता ही गाडी एक चांगला पर्याय ठरेल.

या नवीन जेनएक्स नॅनोमध्ये पूर्वीचेच ६२४ सी सी क्षमता असलेले पेट्रोल इंजिन आहे, पण टाटाने मायलेज वाढवण्यासाठी या इंजिनमध्ये काही सुधारणा केल्या आहेत. म्यॅनुअल गियरच्या या नवीन जेनएक्स नॅनोचे मायलेज २३.६ किमी. प्रति लिटर असून 'ए एम टी' नॅनोचे मायलेज २१.९ किमी. प्रति लिटर असेल असा कंपनीचा दावा आहे. त्याचबरोबर पेट्रोलच्या टाकीची क्षमता १६ वरून २४ लिटर इतकी वाढवण्यात आली आहे. पॉवर स्टेअरिंग, पॉवर विंडोज् आणि म्युजिक सिस्टिमसकट ऑटोमॅटीक गियरचा पर्याय असलेली नवीन जेनएक्स नॅनो जवळपास ३ लाखांपर्यंत जाते.

शहरी वाहतुकीसाठी एक चांगला पर्याय म्हणून या गाडीचा विचार नक्कीच केला जाऊ शकतो.

डॅटसन गो प्लस बाजारात दाखल…! किंमत ३.९६ लाख.डॅटसनने आपल्या सेवेन सीटर मॉडेल गो प्लस ला आज लाँच केले आहे. ४ मीटर पेक्षा क...
15/01/2015

डॅटसन गो प्लस बाजारात दाखल…! किंमत ३.९६ लाख.

डॅटसनने आपल्या सेवेन सीटर मॉडेल गो प्लस ला आज लाँच केले आहे. ४ मीटर पेक्षा कमी लांबी असलेली ही गाडी सर्वात स्वस्त अशी सेवेन सीटर गाडी असणार आहे. पण डॅटसन कंपनीच्या म्हणण्यानुसार शेवटी असलेल्या तिसऱ्या रो च्या सीटवर फक्त १० वर्षापर्यंतची लहान मुले बसू शकतील एवढीच जागा आहे. शेवटची सीट फोल्ड केल्यास सामानासाठी बरीचशी जागा उपलब्ध होते.

डॅटसनचे भारतीय बाजारात गो ह्या हॅचबॅक गाडीनंतर हे दुसरे मॉडेल आहे. या गाडीत १.२ लीटरचे ६८ हॉर्सपॉवर असणारे पेट्रोल इंजिन असून एक लिटर पेट्रोलमध्ये जवळपास २० किलोमीटरचे मायलेज मिळेल असा कंपनीचा दावा आहे. सामान्य ग्राहकांना परवडेल अशा कमी किमतीमध्ये गाडी देण्याचा कंपनीचा हा प्रयत्न आहे असे सांगण्यात आले. पण भारतीय ग्राहक फारच बेसिक असलेल्या या गो प्लसला किती पसंत करतात हे येणारा काळच ठरवेल.

ऑडी चे काही स्टार ग्राहक…!
30/12/2014

ऑडी चे काही स्टार ग्राहक…!

Be it the most exciting cricketer in the Indian cricketing squad or the most charismatic actress in B-town, Audi has impressed one and all. Here are some Audi owners we are proud to have been associated with.

होंडा ची नवीन जॅझ लवकरच बाजारात येणार…!नवीन डिजाईन आणि डिजेल इंजिन असलेली होंडा जॅझ २०१५ च्या मध्यापर्यंत लाँच होण्याची ...
24/12/2014

होंडा ची नवीन जॅझ लवकरच बाजारात येणार…!
नवीन डिजाईन आणि डिजेल इंजिन असलेली होंडा जॅझ २०१५ च्या मध्यापर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. होंडाच्या कारखान्यात या नवीन गाडीचे उत्पादन सुद्धा सुरु झाल्याचे समजते. नवीन जॅझ पहिल्या मॉडेलपेक्षा अधिक स्पोर्टी दिसते पण त्याचबरोबर होंडाच्या नावाजलेल्या डिजेल इंजिनमुळे ग्राहकांना ही गाडी आकर्षित करू शकेल असे वाटते.

ह्युंदाई ची ix25 कॉम्पॅक्ट एस यु वी, भारतात येण्याच्या वाटेवर…!भारतीय बाजारातील कॉम्पॅक्ट एस यु वी च्या वाढत्या मागणीचा ...
02/12/2014

ह्युंदाई ची ix25 कॉम्पॅक्ट एस यु वी, भारतात येण्याच्या वाटेवर…!

भारतीय बाजारातील कॉम्पॅक्ट एस यु वी च्या वाढत्या मागणीचा कल पाहून ह्युंदाई इंडिया 'आयएक्स ट्वेंटीफाईव' या नवीन गाडीला भारतात आणण्याचा विचार करत आहे. याच वर्षी बिजिंग मोटर शो मध्ये या गाडीचे कंसेप्ट मॉडेल दाखवण्यात आले होते आणि बऱ्याच कार प्रेमींसाठी ही गाडी एक आकर्षणाचा विषय ठरली होती.

ह्युंदाई च्या सुप्रसिद्ध फ्लुईडिक डिजाईनवर आधारित असलेली हि गाडी 'सॅंटा फे' सारखीच आकर्षक दिसते. ix25 ही डिजेल आणि पेट्रोल अशा दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. भारतात या गाडीची स्पर्धा रेनॉल्ट डस्टर, निसान टेरानो आणि फोर्ड एकोस्पोर्ट अशा गाडयांशी असणार आहे. या गाडीची किंमत जवळपास ८ लाखांपासून ते १२ लाखांपर्यंत असण्याची शक्यता आहे आणि २०१५ च्या दिवाळी दरम्यान ix25 चा भारतीय बाजारात प्रवेश अपेक्षीत आहे.

http://www.cartime.in/car.php?id=30
21/10/2014

http://www.cartime.in/car.php?id=30

फिएट इंडिया ने आज 'अवेंचुरा' या आपल्या हॅचबॅक श्रेणीतील

18/10/2014

यापैकी आपली सर्वात आवडती डिजेल सेडान गाडी कोणती?

ह्युंदाई वरना
फोर्ड फिएस्ता
निसान सनी
स्कोडा रॅपीड
फिएट लीनेआ
होंडा सिटी
वोल्क्सवॅगन वेंटो

नवीन स्कॉर्पियो बाजारात दाखल…! किंमत ७.९८ लाख.महिंद्राने आपल्या प्रचलीत स्कॉर्पियोला नव्या रुपात सादर केले आहे. या नवीन ...
25/09/2014

नवीन स्कॉर्पियो बाजारात दाखल…! किंमत ७.९८ लाख.

महिंद्राने आपल्या प्रचलीत स्कॉर्पियोला नव्या रुपात सादर केले आहे. या नवीन स्कॉर्पियोची सर्वांनाच दिर्घकाळ प्रतिक्षा होती.
प्रथमदर्शनी ही 'एस यु वी' पहिल्यासारखीच दमदार आणि आकर्षक दिसते. पण महिंद्राने या गाडीत बरेच तांत्रिक आणि अंतर्गत बदल केले आहेत. नवीन स्कॉर्पियोची चासिस हायड्रोफॉरमिंग प्रक्रियेद्वारे बनवली गेली आहे, जी पहिल्यापेक्षा जास्त मजबूत असेल. नवीन गियरबॉक्स वापरण्यासाठी अधिक सुरळीत असून या गाडीचे सस्पेंशन सुद्धा आरामदायक प्रवासासाठी सुधारले गेले आहे.
समोरील बाजूस नव्याने डिजाईन केलेले बंपर आणि ग्रील तसेच आकर्षक असे नवीन प्रोजेक्टर हेडलाईटस् आहेत, ज्यात एल ई डी 'डे टाईम रनींग लाईटस्' चा सुद्धा समावेश केलेला आहे. मागच्या बाजूला एल ई डी टेल लाईटस् आणि स्पॉयलर दिसून येतो. आतमधे पाहिलं तर या गाडीत बरच काही नवीन दिसतं, पुर्णपणे नवीन डॅशबोर्ड, नवीन डिजाईनचे इंस्ट्रुमेंट पॅनल, एसी वेंटस् आणि त्याचबरोबर टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम यामुळे नवीन स्कॉर्पियोचे इंटेरियर फारच फ्रेश दिसते. XUV 5oo सारखेच स्टेअरिंग ज्यावर म्युझिक आणि ईतर कंट्रोल साठी बटन आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने एबीएस आणि एअर बॅग्स सुद्धा आहेत. नवीन स्कॉर्पियो ७ आणि ९ सीटरच्या वेगवेगळ्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
शोरूममध्ये ७.९८ लाखांपासून पुढे किंमत असलेली नवीन स्कॉर्पियो ग्राहकांसाठी खरोखरच एक चांगला पर्याय आहे.

डस्टर आता ऑल व्हील ड्राईव्ह मधे सुद्धा…!
24/09/2014

डस्टर आता ऑल व्हील ड्राईव्ह मधे सुद्धा…!

नवीन अवतारातील स्कॉर्पियो लवकरच बाजारात. बुकिंगला सुरुवात…!महिंद्राची नवीन स्कॉर्पियो येत्या २५ सप्टेंबर रोजी लाॅंच होणा...
16/09/2014

नवीन अवतारातील स्कॉर्पियो लवकरच बाजारात. बुकिंगला सुरुवात…!

महिंद्राची नवीन स्कॉर्पियो येत्या २५ सप्टेंबर रोजी लाॅंच होणार आहे. कंपनीने या गाडीच्या बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात देखील केली आहे. आपल्या जुन्या स्कॉर्पियो च्या ग्राहकांना प्राधान्य देत १५ तारखेपासून आणि इतर सर्व ग्राहकांसाठी १८ तारखेपासून बुकिंगला सुरुवात होणार आहे. नवीन अवतारातील स्कॉर्पियो नक्की कशी दिसते हे लवकरच सर्वांसमोर येईल.

Address

Mumbai
400012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Car Time मराठी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Car Time मराठी:

Share