18/05/2023
गेल्या आठवड्याभरापासून नागभिड येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व्हावा किंवा नागभिड ला जिल्हा घोषित करण्यात यावा अशी केविलवाणी मागणी करण्यात येत आहे. वास्तविक नागभिड हे गाव सुद्धा ब्रम्हपुरी तालुक्यातून जन्मास आले आहे. लोकसंख्येच्या कोणत्याही निकशात बसत नसतांनाही सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून नागभिड आणि चिमूर नगर परिषद बनविण्यात आली. त्यासाठी नागभिड तालुक्यातील दूरवरच्या ८ गावांना जोडून नागभिड नगर परिषद मध्ये जोडले व चिमूर नगर परिषदसाठी ६ गावांचा समावेश करून त्यांच्यावर जबरदस्तीने नगर परिषद लादण्यात आली आहे.असो नागभिड आणि चिमूर चे उखाडे पाखाडे काढण्यापेक्षा ब्रम्हपुरी जिल्हा निर्मिती करीता लक्ष केंद्रित करूया ..
चिमूर आणि नागभिडच्या तुलनेत
ब्रम्हपुरी शहर आणि तालुका लोकसंख्या,भौगलिक, शैक्षणिक,आरोग्य तसेच इत्यादी दृष्टीने अत्यंत मोठे असून ब्रम्हपुरी शहरात ....
१) महसूल उपविभाग
२) पोलिस उपविभाग
३) विद्युत उपविभाग
४) वन उपविभाग
५) मृदा व जलसंधारण उपविभाग
६) जिल्हातील एकमेव शासकीय तंत्रनिकेतन
७) उपअधीक्षक भुमी अभिलेख
८) पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेल्या ख्रिस्तानंद हॉस्पिटल समवेत ४० पेक्ष्या जास्त हॉस्पिटल्स तसेच १०० खाटांचे सर्व अद्ययावत सुविधा असलेले शासकीय रुग्णालय ब्रम्हपुरी येथे मंजूर
९) ब्रम्हपुरी शहरात ५ सिनियर कॉलेज व्यतिरिक्त
१) अध्यापक महाविद्यालय
२) नर्सिंग कॉलेज ब्रम्हपुरी (GNM) तथा सुरबोडी येथे नर्सिंग कॉलेज चे बांधकाम सुरू
३) खासगी १ तथा शासकीय १ अश्या एकूण २ स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था
४) आदिवासी मुला- मुलींसाठी आश्रमशाळा
५) आदिवासी मुलींचे वसतिगृह १ , मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह १ ,
मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह १ ,
नेवजबाई हितकरिणी शिक्षण संस्थेचे मुलांचे १ आणि मुलींचे १ असे एकूण २ स्वतंत्र वसतिगृहे ,
पंचशिल शिक्षण संस्थेचे मुलांचे १ आणि मुलींचे १ असे एकूण २ स्वतंत्र वसतिगृहे
१०) राजर्षी शाहू महाराज निराधार महिलांचे वसतिगृह
११) स्टेट बोर्डाच्या निकालासाठी प्रसिद्ध असलेल्या ख्रीस्तानंद कॉन्व्हेन्ट व्यतिरिक्त आणखी ९ प्रसिद्ध कॉन्व्हेन्ट
१२) चौगान येथे प्रशासकीय महाविद्यालय , कृषी तंत्रनिकेतन , तथा कनिष्ठ महाविद्यालय
१३) बेटाळा येथे डीफॉर्म,बिफॉर्म,DMLT, PGDMLT तथा कनिष्ठ महाविद्यालय
१४) पिंपळगाव,गांगलवाडी,मुडझा येथे कनिष्ठ महाविद्यालय
१५) राज्य तथा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा ब्रम्हपुरी शहरात आयोजित केल्या जातात सोबतच बॉस्केटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल , सॉफ्टबॉल , बेसबॉल , टेनिस , टेबल टेनिस , स्विमिंग , कुस्ती , कब्बडी, खो-खो , क्रिक्रेट, बॅडमिंटन इत्यादी खेळ खेळले जातात, तसेच नगर परिषद चे भव्य मोठे क्रीडा संकुल , यासमवेत ब्रम्हपुरी शहरात राज्य तथा राष्ट्रीय स्तरावरील स्विमिंग स्पर्धा आयोजित होतील असे भव्य दिव्य स्विंमिंग पुलाचे बांधकाम सुरू आहे
१६) जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन होण्याकरिता लागणारी जागा, अधिकारी निवासस्थान आणि पोषक वातावरण केवळ ब्रम्हपुरी शहरात उपलब्ध आहे
सध्यास्थितीत १६ कोटी पेक्ष्या जास्त अंदाजपत्रक असलेली महसूल विभागाची भव्यदिव्य इमारत उभारली जात आहे तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयाची ९ करोड ३० लाख अंदाजपत्रक असलेली नवीन इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे
१७) ई-लायब्ररी चे बांधकाम प्रगतीपथावर असून या व्यतिरिक्त शहरात ५ पेक्ष्या जास्त सार्वजनिक वाचनालय उपलब्ध आहेत
१८) ब्रम्हपुरी शहरात ५ राष्ट्रीयकृत बँक याशिवाय, HDFC , ICICI, UNION BANK, AXIX BANK, CDCC , नागपूर ग्रामीण बँक, भंडारा ग्रामीण बँक, बुलढाणा अर्बन बँक, श्रीराम सिटी , ब्रम्हपुरी अर्बन बँक , ब्रम्हपुरी मल्टीसीटी बँक यांच्या समवेत शहरात मोठ्या प्रमाणात पतसंस्था कार्यान्वित आहेत
१९) ब्रम्हपुरी तालुक्यात ९ पेट्रोल पंप
२०) ब्रम्हपुरी शहरात देशात दुसरा क्रमांक पटकाविलेल्या राईस ब्रान ऑईल ची कंपनी असून मोठमोठ्या राईस मिल्स असून ब्रम्हपुरीतील तांदूळ विदेशात निर्यात केला जातो.
याशिवाय आणखी बऱ्याच जमेच्या बाजू ब्रम्हपुरीच्या बाजूने आहेत.
*ब्रम्हपुरीकरांनो एकत्र यारे!*
*जिल्हा निर्मितीकरीता सज्ज व्हारे!!*
- आपला नम्र
ॲड.आशिष गोंडाणे,ब्रम्हपुरी
मो.नं.:- ९५४५७०५२३६